---Advertisement---

राज्यातील प्राथमिक शाळांना दिवाळी सुट्ट्या जाहीर

---Advertisement---

महाराष्ट्र : राज्यातील प्राथमिक शाळांना दिवाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा संपल्यानंतर शाळांना ८ ते २१ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुट्या देण्यात आल्या आहेत. मात्र, ९ ते २५ नोव्हेंबरपर्यंत सुट्या मिळाव्यात, अशी मागणी शिक्षकांसह काही संघटनांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला असताना राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी यासंदर्भात माहिती दिली असून शासनाकडून प्राप्त झालेल्या वार्षिक कॅलेंडरमधील सुट्ट्यानुसारच शाळांना दिवाळी सुट्टी असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---