राज्यातील या जिल्ह्याना आज यलो अलर्ट; हवामान विभागाची माहिती

तरुण भारत लाईव्ह । २८ सप्टेंबर २०२३। मागच्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या ठिकणी मुसळधार पाऊस झाला. येणाऱ्या काही दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आज राज्यातील काही जिल्ह्यत यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रात तसेच कोकण या भागात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही जोरदार सरी कोसळत आहे. मध्य महाराष्ट्रातही दमदार पाऊस पडत असून, त्यामुळे शेतकरी सुखावला असून, रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जळगावमधील एरंडोल तालुक्यात अंजनी प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा झाल्यामुळे प्रकल्पातून अंजनी नदीच्या पात्रात विसर्ग करण्यात येत आहे.

मागच्या चार ते पाच  दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोर वाढला असून, रत्नागिरी जिल्ह्यात खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी तालुक्यांत ढगांच्या गडगडाटासह जोरदार सरी कोसळल्या.  विदर्भात पावसाचा जोर कमी झाला आहे.