राज्यातील ‘या’ भागांत पुढील 3-4 तासांत विजांच्या कडकडाटासह पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी होण्याची शक्‍यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

दरम्‍यान, पुढील 3-4 तासांत ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटासह आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या 30-40 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यासह, गारपीट धुळे व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे. घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन मुंबई वेधशाळेने आहे.