जानेवारी महिना आज संपत आहे पण वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी उत्तर भारतातील बहुतांश भागात दाट धुके असते. देशाची राजधानी दिल्लीतही दाट धुक्याची चादर आहे. त्यामुळे दिल्ली विमानतळावर 50 हून अधिक उड्डाणे उशीर झाली आहेत. डोंगरावर बर्फवृष्टी झाल्याने पारा घसरला आहे. त्याचा परिणाम मैदानी भागातही थंडीच्या स्वरूपात दिसून येत आहे.
राजधानी दिल्लीतील तापमान बुधवारी सकाळी ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. धुक्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत हलक्या पावसाची शक्यता आहे. अशातच महाराष्ट्रातही फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणखी थंडी वाढणार असल्याचे समोर आले आहे.
राज्यात नाशिक पासून जळगावपर्यंत आणि मुंबईपासून-कोकण पर्यंत अनेक भागांमध्ये पहाटेच्या वेळी तापमानात लक्षणीय घट होणार असून, ही घट येत्या काही दिवसांसाठी कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. निफाडमध्येही तापमानाचा आकडा ९ अंशापर्यंत पोहोचू शकतो. तर पुणे-सातारा व कोल्हापुरातील डोंगराळ भागांमध्ये गारवारे थंडीची चाहूल येण्याची शक्यता आहे.