राज्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार; ‘या’ भागांमध्ये ऑरेंज अलर्ट

राज्यात मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह राज्यात काही भागांत परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणेसह कोकण किनारपट्टी भागात पावसाच्या सरी कोसळत आहे. शनिवारी मुंबईला पावसानं झोडपलं, तर ठाणे जिल्ह्यातही पावसाची रिपरिप पाहायला मिळाली. आजही मुंबईसह उपनगरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 2 ऑक्टोबर रोजी, उत्तर ओडिशा, बिहार, झारखंड, सिक्कीम, उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. हवामान विभागाने ओडिसा, झारखंड राज्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. छत्तीसगड आज आणि उद्या पूर्व मध्य प्रदेशात आणि छत्तीसगडमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर, काही भागांत विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. उत्तर छत्तीसगडमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.