---Advertisement---
छत्रपती संभाजीनगर । राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होईल असे विधान आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे. या मंत्रिमंडळात २० आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागेल असे स्पष्ट केले. सत्तासंघर्षाच्या निकालात सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला दिलासा आहे. त्या १६ आमदारांच्या अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्ष यांनी निर्णय घ्यावा असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. यानंतर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चेला उधाण आले आहे.
आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळ विस्तरात २० आमदार मंत्री होतील अशी माहीती दिली. येत्या आठ ते दहा दिवसात हा विस्तार होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने शिवसेना शिंदे गटाने छत्रपती संभाजीनगर शहरात रॅली काढली.
यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, मंत्री संदिपान भुमरे, शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट उपस्थित होते. या रॅली दरम्यान पत्रकारांशी बोलताना संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करत मंत्रिमंडळ विस्ताराबद्दलही खुलासा केला आहे.
---Advertisement---