मुंबई : महाराष्टात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवार, २० मे रोजी मतदानास प्रारंभ झाला आहे. मुंबईत सहा लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक होत आहे. . सकाळी 9 वाजेपर्यंत 6.33 टक्के मतदान तर धुळे येथे झाले. आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कुटुंबीय, आरबीआय गव्हर्नर शशिकांत दास,अभिनेता धर्मेंद्र, राजकुमार राव अभिनेत्री हेमा मालिनी, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र वायकर व कुटुंबीय, किरीट सोमय्या यांसारख्या प्रमुख चेहऱ्यांनी सकाळीच मतदान केले.
दरम्यान, धुळे लोकसभा मतदार संघातील एकूण ६ विधानसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सुमारे सरासरी ६.९२ टक्के मतदान झाले आहे. बागलाण विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ८ टक्के मतदान नोंदवले गेले आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान टक्केवारी पुढीलप्रमाणे-
धुळे शहर – ५.८४ टक्के
धुळे ग्रामीण – ७.८६ टक्के
शिंदखेडा -५.८७ टक्के
मालेगांव मध्य – ९.०० टक्के
मालेगांव बाहृय – ५.०० टक्के
बागलाण – ८.३८ टक्के
राज्यात 9 वाजेपर्यंत 6.33 टक्के मतदान झाले.
धुळे – 6.92%
दिंडोरी (ST) – 6.40%
नाशिक – 6.45%
पालघर (ST) – 7.95%
भिवंडी – 4.86%
कल्याण – 5.39%
ठाणे – 5.67%
मुंबई उत्तर – 6.19%
मुंबई उत्तर पश्चिम – 6.87%
मुंबई ईशान्य- 6.83%
मुंबई उत्तर मध्य – 6.01%
मुंबई दक्षिण मध्य – 7.79%
मुंबई दक्षिण – 5.34%