राज्यावर दुष्काळाचे ढग; काय आहेत हवामान विभागाचा अंदाज?

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. शेतीची कामे खोंळबली आहेत. अनेक भागांमध्ये दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावले आहे.

अशातच हवामान विभागाने येत्या २ ते ३ दिवसांमध्ये राज्यात पावसाची शक्यता वर्तवली होती. ऑगस्ट महिना सुरू झाला तरी अद्याप पावसाने दडी मारली आहे. राज्यात आता पुन्हा कधी पावसाला सुरुवात होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. सप्‍टेंबरमध्‍ये येणार्‍या 4 आठवड्यांसाठी हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे.

सप्‍टेंबरच्‍या पहिल्‍या आठवड्यामध्ये दक्षिण द्वीपकल्प, महाराष्‍ट्र (मराठवाडा), कोकण, गोवासह मध्य भारतातील काही भागात पावसाला सुरुवात होणार आहे. 31 ऑगस्‍ट, सप्‍टेंबरमध्‍ये येणार्‍या 4 आठवड्यांसाठी IMD च्‍या पावसाचा अंदाज: सप्‍टेंबरच्‍या 1ल्‍या आठवड्याच्‍या मध्‍ये ते सप्‍टेंबरच्‍या मध्य; दक्षिण द्वीपकल्प, महाराष्‍ट्र (मराठवाडा), कोकण, गोवा यासह मध्य भारतातील काही भागांत पावसाच्‍या चांगल्या पुनरुज्जीवनाची शक्‍यता असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी यासंदर्भात टि्वट करुन दिली आहे.

यावर्षी पावसामध्ये मोठी घट झाली आहे. राज्यातील अनेक भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. परंतु सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होईल अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, राज्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात होणार असून दुसऱ्या आठवड्यात दमदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.