राज्य शासनाने आदिवासींच्या हिताचा घेतला निर्णय, आदिवासी तरुणांच्या ६९३१ पदभरतीस मंजुरी – ना. डॉ. गावित

नंदुरबार : महाराष्ट्र सरकारने पेसा क्षेत्रातील पद भरतीला मान्यता दिली आहे. राज्यातील आदिवासी तरुणाचे ६९३१ पदांच्या पदभरतीस मंजूरी दिली. राज्यसरकारकडून आदिवासी तरुणांसाठी हा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे मी सरकारचे आभारी आहे. हा आदिवासींना दिलासा देणारे व हिताचे निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री. डॉ. विजयकुमार गावित यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत ना.डॉ. विजयकुमार गावित म्हणाले की, राज्यपालांच्या आदेशानुसार राज्य सरकारने ५० टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पेसा क्षेत्रातील पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून राज्यसरकारकडून आदिवासींना दिलासा देणारे व हिताचे निर्णय घेण्यात आला आहे. आरक्षणासंदर्भात निर्णय घेतांना राज्य सरकारने ५० टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात शंभर टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच २५ ते ४९ टक्के लोकसंख्या असलेल्या ठिकाणी ५० टक्के आरक्षण तर २५ टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी २५ टक्के आरक्षण राहणार आहे. पेसा क्षेत्रातील पद भरतीला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. राज्यात ६९३१ पदांच्या पदभरतीस मंजुरी दिली.

जिल्ह्यात ५२२ पदांची भरती विविध विभागांमध्ये होणार असून आतापर्यंत २३१ पदांची भरती झाली आहे. त्यात ४९ जणांना पदभरतीचा आदेश देण्यात आला आहे. तसेच मानधन तत्वावर पेसा संवर्गातील ५२ पदे नंदुरबार जिल्ह्यात असून ४३ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. दिनांक ७ व ८ ऑक्टोंबर रोजी निवड झालेल्या पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करुन त्या संदर्भाचे आदेश निर्गमीत करण्यात येईल. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी ही पद भरती राबविण्यात आली आहे. राज्य सरकारकडून आदिवासी बांधवांना दिलासा देणारे व आदिवासींच्या हिताचे निर्णय घेतले असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास ना.डॉ. गावित यांनी दिली.