बार, क्लब मध्ये जाऊन जर तुम्हीपण जर मद्य पित असाल तर तुमच्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घोषित केला आहे. सरकारने परमिट रुममध्ये विक्री होणाऱ्या मद्यावरील ‘व्हॅट’मध्ये ५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
बारमधील मद्यदरात वाढ होणार आहे, तरी मद्याच्या दरावर कोणताही परिणाम होणार नाही. कारण तेथील व्हॅट आधीपासूनच २० टक्के इतका आहे. सरकारने या आधीच अबकारी परवाना शुल्क वाढवल्याने व्यावसायावर ताण निर्माण झाला आहे.
व्हॅटमध्ये ५ टक्क्यांची वाढ करण्यात आल्याने मद्याचे दर वाढणार असून याचा व्यावसायावर परिणाम होणार आहे, असं बारचालकांचं म्हणणं आहे. घेतल्याने आपल्या उद्दिष्टांना धक्का पोहोचणार असल्याचं मतही बारचालकांनी व्यक्त केलं आहे