राज्य सरकारचा मोठा निर्णय, अखेर औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलले

संभाजीनगर : महाराष्ट्र्र सर्वात मोठी बातमी समोर येते आली आहे. ती म्हणजे औरंगाबाद शहरानंतर आता संपूर्ण जिल्ह्याचे नाव बदलले जाणार असून आता संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याचे नाव हे छत्रपती संभाजीनगर करण्यात येणार आहे. याचबरोबर उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव आता धाराशिव करण्यात येणार आहे.महाराष्ट्र सरकारने  नुकतेच औरंगाबादचे नाव हे छत्रपती संभाजीनगर करण्याची घोषणा केली होती. पण शहर आणि जिल्हाचे  नावबदल करण्यात  अडचणी येत होत्या. या अडचणींवर आता मार्ग काढण्यात आला असून.

शनिवारी मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्याचे नामफलकाचे उदघाटन करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे पूर्ण ७  सात वर्षांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण जिल्ह्याचे नाव हे छत्रपती संभाजीनगर केले जाणार असून आज त्याच्या नामफलकाचे उदघाटन करण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.संभाजीनगर येथे .दुष्काळामुळे होणारी ही मंत्रिमंडळ बैठक खुप महत्वाची असल्याचे बोले जात आहे.  संपूर्ण मंत्रिमंडळ आणि प्रशासन संभाजीनगरमध्ये उपस्थित आहेत.