हेल्थ टिप्स: रात्रीचे जागरण केल्याने किंवा चुकीच्या पद्धतीने आहार घेतल्याने आजकाल झोप न येण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे, थकवा येणे, अशक्तपणा येणे आणि निद्रानाशाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रोजचे धावपळीचे जीवन, बिघडलेला आहार, व्यायामाचा अभाव आणि चुकीच्या सवयींमुळे आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अनेकदा असे होते की, चुकीच्या आहारामुळे देखील झोप न येण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे, हे पदार्थ संध्याकाळी ५-६ नंतर खाणे टाळायला हवेत.
लिंबूवर्गीय फळांचे सेवन करणे टाळा
व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेल्या फळांचा लिंबूवर्गीय फळांमध्ये समावेश आढळून येतो. या फळांमध्ये लिंबू, संत्रा आणि टोमॅटो इत्यादी फळांचा समावेश असतो. यामध्ये असलेले टायरामाईन हे अमिनो अॅसिड आपल्या शरीराला सक्रिय बनवते. त्यामुळे, झोप न येण्याची समस्या वाढते. शिवाय, झोपण्यापूर्वी आंबट-गोड फळांचे सेवन केल्याने शरीरात मोठ्या प्रमाणात ॲसिड तयार होते. त्यामुळे, ॲसिडिटीची समस्या आणि जळजळ होते.
कॉफीचे सेवन करू नका
अनेक जणांना रात्री झोपण्यापूर्वी कॉफी प्यायला आवडते. मात्र, रात्री झोपण्यापूर्वी कॉफीचे सेवन केल्याने झोप न येण्याची समस्या निर्माण होते. खरे तर कॉफीमध्ये असलेले कॅफिन आपल्या शरीरातील सतर्कता वाढवते. त्यामुळे, आपला मूड फ्रेश राहतो आणि लवकर झोप येत नाही.