रात्री झोप येत नाही? करा ‘हे’ घरघुती उपाय

बदलत्या जीवनशैलीमुळे झोप न येण्याची समस्या प्रमाण वाढत आहे. झोप न लागण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. जसे मानसिक तणाव, हृदयविकार किंवा नैराश्य. झोपेच्या कमतरतेमुळे लोकांना सुस्ती, अशक्तपणा, आळस आणि अस्वस्थता जाणवते. आजच्या जीवनशैलीत झोपेशी संबंधित समस्या लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनत आहे, ज्यामुळे लोकांच्या एकूण आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. ज्यांना रात्री उशीरापर्यंत सुद्धा झोप न येण्याची समस्या आहे, ते काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकतात.

1. केळी आणि मध
झोपण्यापूर्वी जर तुम्ही केळी आणि मध यांचे एकत्र सेवन केले तर तुम्हाला सहज झोप लागू शकते. दोन्ही गोष्टी बाजारात सहज उपलब्ध होतात. केळीमध्ये ट्रिप्टोफॅन असते ज्यामुळे झोप येते तर मधाचे सेवन केल्याने ओरेक्सिन रिसेप्टर्स शांत होतात जे मेंदूला जास्त काळ जागृत ठेवतात. यामुळे झोप येते आणि काही वेळातच तुम्ही झोपी जाता.

2. बदाम
बदाम हे हेल्दी फॅट्स, एमिनो ॲसिड आणि मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहे. जे तुम्हाला लगेच झोप येण्यासाठी मदत करतात. यामुळे तुमच्या झोपेची गुणवत्ता देखील सुधारते. जर तुम्ही एक ग्लास कोमट दुधात थोडे मध आणि बदाम मिसळून प्यायले तर तुम्हाला लवकर झोप लागेल.

3. दूध
ट्रिप्टोफॅन तयार करण्यासाठी प्रथिने देखील आवश्यक असतात. त्यामुळे तुम्ही रात्री एक ग्लास दूध प्यायले तर त्याचा तुमच्या मेंदूवर शांत प्रभाव पडतो. तसेच न्यूरॉन्सला विश्रांती मिळते आणि झोप लवकर येते. झोप येण्यासाठी दूध हा एक उत्तम उपाय आहे.