अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा हा २२ जानेवारी 2024 रोजी संपन्न होणार आहे. या सोहळ्याची सर्वच लोक आतुरतेने वाट पाहत आहे. या सोहळ्या साठी खुप मोहमोठ्या मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले तब्ब्ल साडेचारशे वर्षांच्या संघर्षानंतर राम मंदिर होत आहे, या सोहळ्यासाठी त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत.’श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’ने सर्वसामान्यांना आवाहन केले आहे की, ‘ते जेथे असतील तेथे भजन-कीर्तन करा, जवळच्या मंदिरांमध्ये कार्यक्रम आयोजित करा, अयोध्येत जास्त गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.’ असे सांगण्यात आले आहे.
राम मंदिरासाठी 8000 विशेष पाहुण्यांना आमंत्रित केले आहे
राम मंदिरासाठी 8000 मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले असून ते अभिषेक कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यापैकी माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित राहणार आहेत.
सचिन आणि विराट अनेकदा धार्मिक कार्यक्रमांचा भाग बनतात. विराट कोहली, पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत वृंदावन येथील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात आणि महाकाल मंदिरात प्रार्थना करताना दिसला. त्याचप्रमाणे सचिन तेंडुलकरनेही अनेकदा गणेश चतुर्थीला विधीनुसार पूजा केली आहे. 1990 च्या राम मंदिर आंदोलनात बलिदान देणाऱ्या कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही बोलावण्यात आले आहे. तसेच देशभरातील 4000 संत-मुनी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम अतिशय भव्यदिव्य होणार असून त्यात सर्व देशांचे राजदूतही उपस्थित राहणार आहेत.