राम मंदिराबद्दल अफवा पसरवणाऱ्या कट्टरपंथी तरुणाला पोलीसांनी दिला दणका.

लखनऊ : अयोध्येतील राम मंदिरात वंचितांना प्रवेश करू दिला जात अफवा पसरवणाऱ्याच्या मुसक्या पोलीसांनी आवळल्या. शान-ए-आलम या तरुणाच्या व्हायरल व्हिडीओमुळे ही अफवा पसरली. यामुळे समाजातील एका वर्गाला सरकारविरोधात भडकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान पोलीसांत याबद्दल तक्रार गेल्यानंतर शान-ए-आलमच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पोलीसांनी त्याला बुधवार, दि. ३१ जुलै रोजी अटक केली.

शान-ए-आलमने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. यात “वंचितांना अयोध्या राम जन्मभूमी मंदिरात प्रवेश दिला जाऊ नाही”, असे तो म्हणाला. पोलीसांनी याबद्दल खात्री केल्यानंतर त्याच्याविरोधात कारवाई केली. तक्रारदाराने काही दिवसांपूर्वी ही व्हिडीओ पाहिला होता. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी शान-ए-आलमला ताब्यात घेतले. तसेच त्यानंतर त्याच्यावर आयपीसी कलम ५०५ आणि ५०५ (२) कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यानंतर तक्रारदाराला धमकावण्याचा प्रकार सुरू झाला.

आपली तक्रार हिंदू युवकाने केली याबद्दल माहिती समजली असता आरोपी शान तक्रारदाराच्या घरी गेला. त्यावेळी शान-ए-आलमसोबत काही साथीदारही होते. त्यावेळी त्याने तक्रार मागे घेण्यास न घेतल्यास मारहाण करण्याची धमकी तक्रारदाराला दिली. मात्र तक्रारदाराने भारतीय न्याय संहिता कलम ५०२ गुन्हा दाखल केला.