राम मंदिर लोकार्पणाचा अमेरिकेत देखील जल्लोष

अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे. मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जल्लोष आतापासूनच साजरा केला जात आहे. नुकतेच अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसी येथील मेरीलँडच्या श्री भक्त आंजनेय मंदिराजवळ विश्व हिंदू परिषदेच्या वतीने चारचाकी आणि मोटारसायकल रॅली काढण्यात आली. अनेक भाविक या रॅलीत सहभागी झाले होते. म हिनाभर या रॅलीचे आयोजन केले जाणार आहे.
मंदिराजवळ असलेल्या ‘अयोध्या मार्ग’ या रस्त्यावरून वाहन आणि म ोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी अमेरिकन हिंदू समाजातील अनेक लोक मोठ्या संख्येत जमले होते. लहानथोरांपासून ते वृद्धापर्यंत अनेकांचा यात सहभाग होता. अमेरिकेच्या इतर राज्यांतूनही काही हिंदू भाविक या रॅलीत सहभागी होण्यासाठी आले असल्याचे सांगण्यात आले.विश्व हिंदू परिषदेच्या वॉशिंग्टन डीसीचे अध्यक्ष महेंद्र सापा या कार्यक्रमाच्या आयोजकांपैकी एक आहेत. त्यांनी सांगितले की, २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राममंदिराची प्राणप्रतिष्ठा होईल.

त्याआधी आम्ही वॉशिंग्टन येथे राम मंदिर लोकार्पण सोहळा साजरा केला. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर भगवान श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा अयोध्येत होत आहे. त्यासाठी २० जानेवारी रोजी आम्ही वॉशिंग्टन डीसी येथे ऐतिहासिक अशा सोहळ्याचे आयोजन केले आहे, ज्यात एक हजार हिंदू कुटुंब सहभागी होतील.यावेळी रामलीला, राम कथा, श्रीराम आरती आणि भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. सोहळ्याचे सहआयोजक अनिमेश शुक्ला यांनी सांगितले की, २० जानेवारी रोजी होणाऱ्या सोहळ्यात लहान मुलांकडून ४५ मिनिटांचे श्रीरामांच्या जीवनावर आधारित एक छोटे नाटक सादर केले जाणार आहे. अमेरिकन मुलांना समजेल अशा भाषेत हे नाटक तयार केले आहे. या रॅलीमध्ये भारतातील इतर भाषिक भाविकही सहभागी झाले होते. त्यात तामिळ, कन्नड, तेलुगू भाविकांचा विशेष सहभाग होता. श्रीरामाचे त्यांच्या जीवनात काय महत्व आहे, याबद्दलच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. अंकुर मिश्रा हे स्थानिक हिंदू नेते असून, त्यांचा जन्म अमेरिकेतच झालेला आहे. आम्ही अमेरिकन नागरिक झालो असलो तरी, आमच्या अनेक पिढ्यांनी अयोध्येत राम मंदिर व्हावे, असे स्वप्न पाहिले असल्याचे
सांगितले.