पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपल्या पक्षाची अंतर्गत बैठक घेतली. या बैठकीत पक्ष्याचे सर्व आमदार, खासदार उपस्थित होते. या बैठकीनंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली. रायगडमधून खासदार सुनील तटकरे हे उमेदवार असतील, असं त्यांनी जाहीर केलं. अजित पवार यांनी यावेळी महायुतीच्या जागावाटपाबाबतही भाष्य केलं.
“आम्ही एकत्रपणे चर्चा करुन जवळपास महायुतीच्या 48 जागांबद्दल महाराष्ट्रात कुणी कोणत्या जागा लढवायच्या त्याबद्दल ठरवलं आहे. जवळपास 99 टक्के काम पूर्ण केलेलं आहे. फक्त आमचं ठरलं आहे की, 28 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्रितपणे बसून मुंबईला पत्रकार परिषद घेऊ. आता पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवार जाहीर करणं क्रमप्राप्त होतं. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत”, असं अजित पवार म्हणाले