जळगाव : रावेर डेपोतील बसचा आज शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा घाटाच्या फारेस्ट गेटजवळ अपघात झाला. समोरून येणारे टेम्पोला दुसरी बस ओव्हर टेक करत होती. त्यावेळी चालकाचे बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला जावून ७ फूट खाली जावून पलटी. या अपघातात ६ ते ८ प्रवासी जखमी झाले आहेत. जळगाव विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
रावेर आगारातील एमएच ४० वाय ५१९७ ही बस पुणे ते रावेर असा प्रवास करत असताना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अजिंठा घाटातील फारेस्ट गेट समोरून बस जात असताना समोरून मालवाहू एमएच २० जीसी ७८४० टेम्पोला दुसरी बस ही तिच्या मागून ओव्हर टेक करत होती.
त्यावेळी पुणे-रावेर बसवरील चालक योगेश तायडे यांचे बसवरील ताबा सुटला. धावती बस रस्त्याच्या पलीकडे जावून ७ फूट खाली जावून पटली झाली. या बसमध्ये एकुण ७२ प्रवाशी होते. त्यापैकी ६ जण गंभीर जखमी झाले आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अजिंठा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने नजीकच्या रूग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.