तरूण भारत लाईव्ह रावेर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांपैकी महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलला १३ जागा मिळाल्या आहेत. यातून जनतेनं आघाडीला स्पष्ट बहुमताचा कौल दिला आहे. भाजप पुरस्कृत लोकमान्य शेतकरी पॅनलला तीन , तर अपक्ष दोन जागांवर विजयी झाले. प्रहार जनशक्तीच्या परिर्वतन शेतकरी पॅनलला खातेसुध्दा उघडता आले नाही. मतमोजणी निकाल ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. निवडणूक निरीक्षक तथा तहसीलदार बंडू कापसे यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी विवेकानंद विद्यालयात सात टेबलांवर मतमोजणी करण्यात आली. यावेळी सचिव गोपाळ महाजन, कमलेश पाटील, संतोष तायडे मतमोजणीच्या प्रक्रीयेत सहकार्य केले.