रावेर लोकसभेसह विधानपरिषदेसाठी 5 जागांची मागणी करणार

जळगाव:  गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यात काँग्रेसची स्थिती मजबूत केली आहे.एक लाखापेक्ष्ाा अधिक सक्रिय सदस्यांची नोंदणी केली आहे. त्यानुसार आगामी लोकसभा निवडणुकीत रावेरसह विधानपरिषदेसाठी 5 जागा मिळाव्यात याबाबतचा आग्रह धरणार असल्याची माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष्ा प्रदीप पवार यांनी गुरुवारी काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.काँग्रेसचे प्रांताध्यक्ष्ा नाना पटोले हे शनिवार, 28 रोजी अकोल्याहून जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस जिल्हाध्यक्ष्ा प्रदीप पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. जिल्ह्यातून काँग्रेस  हद्दपार झाली असल्याचा आरोप होत असला तरी गेल्या दोन वर्षापासून पक्ष्ााचे संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे.

अनेक निष्क़्रिय समित्यांम्ाध्ये बदल केले असून जवळपास 49 विविध सेल व बुथ संघटन तयार केले आहेत. एक सेलमध्ये जवळपास 80 सक्रिय सभासदांची नियुक्ती केली आहे. विविध यात्रांच्या माध्यमातून जिल्हाभरातील विविध गावांमध्ये जावून सभासदांची नोंदणी केली आहे. त्यानुसार जवळपास एक लाखापेक्ष्ाा अधिक सक्रिय सभासद तयार केले आहेत.रावेरसह पाच जागांचा आग्रह रावेर लोकसभा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत या जागेवर दावा आहे. यासोबतच विधानसभेसाठी पाच जागा मिळण्यासाठी आग्रही असणार आहे.

असा आहे प्रांताध्यक्ष्ा नाना पटोले यांचा दौरा

सकाळी 9.30 वा काँग्रेस भवन, 10 वाजता गोदावरी इंजिनीअरींग कॉलेज येथे शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक, दुपारी 1 वाजता पत्रपरिषद, दुपारी 3 वाजता बोदवड येथे जाहीर सभा, मुक्ताईनगरात स्वागत, सायंकाळी 7 वाजता शहराध्यक्ष्ा श्याम तायडे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या भेटी, रात्री पावणेआठला धरणगाव येथे काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन, रात्री 8.45 वा. अमळनेर येथे जाहीर सभा व रात्री 10 वाजता नंदुरबार येथे प्रयाण. रविवार, 29 रोजी नंदुरबार येथील विविध कार्यक्रमांना हजेरी लावून रात्री  चाळीसगाव येथून मुंबईकडे प्रयाण करतील.

थेट दिल्लीच्या कार्यालयात होतेय नोंदणी

पक्ष्ााच्या सभासद नोंदणीसाठी स्वतंत्र असे ॲप तयार केले आहे. या ॲपनुसार सक्रिय सभासदांची मोबाईलव्दारे नोंदणी केली आहे. त्याची नोंद थेट दिल्लीतील काँग्रेस भवनात होत आहे. जिल्ह्यात आतापर्यत एक लाखापेक्ष्ाा अधिक सभासदांची नोंदणी केली असल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष्ा प्रदीप पवार यांनी सांगितले.