राष्ट्रवादीचे नेते ईश्वरलाल जैन यांच्या निवासस्थानी सीबीआयची धाड

तरुण भारत लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२२ । राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खजिनदार व माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या आर.एल.फर्म व निवासस्थानी मंगळवारी सी.बी.आय.चे पथक धडकले. या कारवाईमुळे शहरातील सराफ बाजारपेठेत एकच खळबळ उडाली.

हे पथक मुंबई येथील असून स्टेट बँकेकडून घेतलेल्या कर्ज प्रकरणावरून ईश्वरलाल जैन यांच्याविरुद्ध तक्रारी होत्या. त्या प्रकरणातच हे पथक सकाळपासून ठाण मांडून होते. ईश्वरलाल जैन हे आपल्या कार्यालयातच बसून होते. तेथे या पथकाकडून जाबजबाब घेण्यात येत होते.