राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल हे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार, किती आहे संपत्ती ?

मुंबई: आगामी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून नुकतेच काँग्रेस सोडून भाजपात गेलेल अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर, शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल हे, राज्यसभेसाठीअर्ज दाखल केलेल्या उमेदवारांपैकी सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. पटेल यांनी दाखल केलेल्या अर्जात त्यांच्याकडे एकूण ४६३ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेनेचे उमेदवार मिलिंद देवरा यांची १३७ कोटी रुपये संपत्ती आहे. काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांची सर्वांत कमी म्हणजे एकूण ३.३६ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

पटेल यांनी १४९ कोटी रुपयांची जंगम तर २८७.७० कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता घोषित केली तर त्यांच्या पाठोपाठ शिवसेनेच्या मिलिंद देवरा यांनी ११३.९९ कोटी रुपयांची जंगम तर २३.९९ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता घोषित केली. भाजपतर्फे अर्ज भरलेल्या अशोक चव्हाण यांच्याकडे १६.९९ कोटी रुपयांची जंगम तर ५१.६५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.