जळगाव : काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात करण्यात येणाऱ्या वक्तव्यांचा जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन शहर जिल्हाध्यक्ष श्याम तायडे यांच्या नेतृत्वाखाली आकाशवाणी चौकात करण्यात आले. या आंदोलनात महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते.
याप्रसंगी भाजपाचा तरविंदर मारवा व वनीत बिट्टू, अनिल बोंडे व शिंदे गटाचा संजय गायकवाड यांच्या निषेधार्थ त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आली. रास्ता रोको आंदोलन हे तासभर करून जनतेचे लक्ष याकडे वेधून घेतले. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष श्यामकांत तायडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्राच्या प्रभारी प्रतिभा शिंदे, जळगाव शहराच्या माजी महापौर जयश्री महाजन, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ पदाधिकारी मंगला पाटील, जेष्ठ पदाधिकारी वाल्मीक पाटील, शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष अशोक लाडवंजारी, माजी नगरसेवक सुनील माळी, माजी नगरसेवक राजू मोरे, माजी जि प सदस्य उत्तमराव महाजन, माजी नगर अध्यक्ष दारा मोहम्मद माजी, नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजू पाटील, माजी युथ काँग्रेस अध्यक्ष भगतसिंग पाटील, युवक अध्यक्ष मुजीब पटेल, रिंकू पाटील, काँग्रेसचे सरचिटणीस दीपक सोनवणे, राहुल भालेराव, शहर सरचिटणीस सुधीर पाटील, विशाल पवार, गणेश राठोड, योगिता शुक्ला, अमिना तडवी, सुमन मराठे, रत्न बागुल, मीनाक्षी जावळे, राष्ट्रवादीच्या प्रतिभा शिरसाठ, डॉ. अनिल शिंदे, सुभाष पाटील, नामदेवराव चौधरी, प्रशांत सुरळकर, किरण राजपूत, दिनेश महाशब्दे आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.