आसाम : राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील सध्या भारत जोडो न्याय यात्रा सुरु आहे, यातच आसाममध्ये भारत जोडो न्याय यात्रेचे अधिकारी आणि आसाम सरकारचे अधिकारी यांच्यात वाद सुरू आहे. त्यानंतर काही वेळातच गुहाटीचा प्रवेश केंद्र खानापारा क्रॉसिंग येथे आसाम पोलिस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चकमक झाली.यादरम्यान,सीएम हिमंता बिस्वा सरमा यांनी राज्याच्या डीजीपींना कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडल्यास त्वरित गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट करून हे आसामी संस्कृतीचा भाग नसल्याचे म्हटले आहे. आम्ही शांतताप्रिय राज्य आहोत. अशा नक्षलवादी डावपेच आपल्या संस्कृतीपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत. त्यांनी लिहिले की, मी आसाम पोलिसांच्या डीजीपींना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच जमावाला भडकावून तुमच्या हँडलवर पोस्ट केलेले फुटेज पुरावा म्हणून वापरण्यास सांगितले. तुमच्या अनियंत्रित वर्तनामुळे आणि मान्य मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यामुळे आता गुवाहाटीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. हा संघर्ष अशा वेळी झाला जेव्हा मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या सरकारने काँग्रेस यात्रेला शहरापासून दूर जाण्याचे आणि गुवाहाटी बायपासचा वापर करण्याचे निर्देश दिले होते.पोलिसांनी यात्रेला शहरातील एंट्री पॉइंटवर रोखले, त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले. काही वेळातच दोन्ही बाजूंनी हाणामारी सुरू झाली. काँग्रेस पक्षाकडून या संघर्षाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.