IND vs ENG Ranchi Test : टॉम हार्टली आणि बशीर यांनी भारतीय फलंदाजना नाके नऊ आणत त्यांनी भारतीय फलंदाजना जास्त वेळ मैदानावर खेळी करू दिली नाही परिणामी भारताची अवस्था 7 बाद 177 धावा अशी केली. यशस्वी जैस्वालने 73 धावांची खेळी करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, यशस्वी जैस्वालने आपल्या अर्धशतकी खेळीदरम्यान भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविडचा एक मोठा विक्रम मोडला. यशस्वी जैस्वाल आता इग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.
भारताकडून इंग्लंडविरूद्धच्या एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने 655 धावा केल्या होत्या. यानंतर 603 धावा करणाऱ्या राहुल द्रविडचे नाव होते. मात्र आता त्याला मागे टाकून यशस्वी जैस्वालने दुसरा क्रमांक पटकावला आहे.