जळगाव : लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे शहराच्या विविध भागातील राजकीय पक्षांचे चिन्हे, ध्वज, फलक, झेंडे, कोनशिला आदी झाकण्यात येत आहेत. मात्र काही ठिकाणी यास विरोध केला जात आहे. त्यामुळे याबाबत महापालिकेच्या आचारसंहितेच्या नियमानुसार महापालिकेची रितसर परवानी घ्यावी किंवा सबंधितांनी पेंटींग, कोनशिला, फलक काढावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. राजकीय पक्षाची जाहिरात होईल, अशा स्वरूपाचे होर्डिंग्ज, बॅनर, स्टीकर, झेंडे काढण्यासह विकास कामांच्या कोणशिला, हायम स्ट लॅम्पवरील नावे, राजकीय लोकांनी ठेवलेल्या बाकड्यांवरील नावे झाकण्यात यावे, अशा सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या होत्या.
त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून काही प्रमाणात राजकीय होर्डिंग्ज, बॅनर, स्टीकर, झेंडे काढले असून कोणशिला, हायमस्ट लॅम्पवरील नावे, राजकीय लोकांनी ठेवलेल्या बाकड्यांवरील नावे झाकण्यात आले. मात्र, अजूनही शहरातील तर होऊ शकतो गुन्हा दाखल आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यास गेले असता काही जणांकडून त्यांना विरोध केला जात आहे. त्यामुळे पथकाला परत फिरावे लागते. त्यामुळे त्यांनी तातडीने महापालिकेत रितसर अर्ज करून परवानगी घ्यावी. म्हणजे तसा अहवाल निवडणूक आयोगाला पाठवता येईल.
तसे न केल्यास सबंधितांवर आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकत असल्याचेही महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.विविध भागांमधील भिंतींवरील पक्षाची जाहिरात होईल, असे पेंटींग्स् पुसण्यात आलेले नाहीत. ते पुसण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी गेले असता सबंधित त्यांना परवानगी घेतली असल्याचे सांगत आहेत. मात्र आदर्श आचारसहिंता लागु झाल्यापासून आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने याबाबत अधिकृत शुल्क भरून परवानगी घेतलेली नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.