---Advertisement---

रिया चक्रवर्तीने सुशांतच्या मृत्यूबद्दल खुलासा करत म्हटले की…

by team
---Advertisement---

मुंबई : २०२० मध्ये सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या करून हे जग सोडलॆ.सुशांत चे निधन सर्वांच्या मानला चटका लावून गेले. मात्र या प्रकरणामुळे अभिनेत्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती सर्वाधिक चर्चेत होती.आता 3 वर्षांनंतर रिया चक्रवर्तीने याप्रकरणी मौन सोडले आहे,रिया वरती सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. दरम्यान एका मुलाखतीत रिया चक्रवर्तीने सुशांत सिंग राजपूत प्रकरणाबद्दल उघडपणे बोलले.

रिया चक्रवर्ती म्हणाली, ‘मला आता पर्वा नाही, मी खूप प्रगती केली आहे. माझे पूर्वीचे आयुष्य आणि आताचे आयुष्य यात खूप फरक आहे. वयाच्या 31 व्या वर्षी मला माझ्या आतल्या 81 वर्षांच्या बाईसारखे वाटले. पण नंतर मी थेरपीची मदत घेतली आणि आता या सगळ्यातून पुढे आली आहे. रिया चक्रवर्तीने पुढे सुशांतच्या मृत्यूबद्दल खुलासा करत म्हटले की, लोक माझ्याकडे गुन्हेगार असल्यासारखे पाहतात.

रिया पुढे मानसिक आरोग्याबद्दल बोलली आणि म्हणाली, ‘या देशात कोणीही याबद्दल नीट बोलत नाही. पण नवीन पिढी याबद्दल बोलते याचा मला आनंद आहे. पण जेव्हा एखादा सेलिब्रिटी यातून जातो तेव्हा लोक त्याचा मुद्दा बनवतात. सुशांतबद्दल बोलताना रिया पुढे म्हणाली, ‘त्याने त्याचा जीव का घेतला हे मला कधीच कळले नाही. कारण मी त्याच्या मनात प्रवेश केला नव्हता. जसे लोक माझ्याबद्दल विचार करतात. पण त्यावेळी सुशांत मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता आणि मलाही याची जाणीव होती हे खरे आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment