रिलायन्स इंडस्ट्रीजचा नवा विक्रम ‘या’ बाबतीत ठरली देशातील पहिली कंपनी

रिलायन्स इंडस्ट्रीज : 13 मार्च 2024 हा दिवस भारतासह शेअर बाजाराच्या इतिहासाच्या पानावर नोंदवला गेला आहे. या दिवशी देशातील एकाच कंपनीचे मूल्य 20 लाख कोटी रुपये झाले आहे. मात्र, आज कंपनीच्या शेअर्समध्ये 1.88 टक्क्यांची वाढ दिसून आली आणि कंपनीच्या शेअर्सने 2957.80 रुपयांचा विक्रमी टप्पा गाठला.

बाजार उघडल्यानंतर दोन तासांतच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सने विक्रमी पातळी गाठली आणि कंपनीच्या मार्केट कॅपने नवा विक्रम प्रस्थापित केला. गेल्या काही महिन्यापासून बाजार विशेषज्ञांचे म्हणणे होते की रिलायन्स तीन हजार या आकड्यापर्यंत पोहचेल पण ती वेळ एवढ्या लवकर येईल याची कोणालाच खात्री नव्हती.

विशेष बाब म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे ज्याचे मूल्यांकन 20 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. तथापि, रिलायन्स इंडस्ट्रीज देखील आशियातील त्या कंपन्यांच्या यादी मध्ये सामील झाली आहे ज्यांचे मूल्यांकन 20 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. जॅक माच्या अलीबाबा समूहाचे मूल्यांकन १५ लाख कोटी रुपयांच्या खाली गेले आहे. याचा अर्थ रतन टाटांची टीसीएस आता अली बाबा समूहाच्या पुढे पोहोचली आहे. जपानी ऑटो कंपनी टोयोटा आता रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पुढे आहे. ज्यांचे मार्केट कॅप 31 लाख कोटी रुपये आहे.