रिलायन्स-डिस्ने विलीनीकरणामुळे भारतीय क्रिकेटचे गणितच बदलणार?

मुंबई:  भारतीय क्रिकेटवर भविष्यात परिणाम करणारा एक व्यवहार नुकताच झाला आहे. रिलायन्स व डिस्ने इंडियाचे विलीनीकरण झाले आहे. याचा भारतातील क्रिकेट प्रक्षेपण क्षेत्रावर मोठा परिणाम होणार आहे. यामुळे प्रेक्षकांना सर्व मोठ्या क्रिकेट स्पर्धा एकाच प्लॅटफॉर्मवर बघावयास मिळणार आहे. तो प्लॅटफॉर्म म्हणजे जिओ सिनेमा! रिलायन्स इंडस्ट्रिज आणि डिस्ने स्टार इंडियाचे विलीनीकरण मुल्य हे जवळपास ७०,३५२ कोटी रूपयांच्या आसपास आहे. या विलीनीकरणाचा थेट परिणाम हा भारतातील क्रिकेट चाहत्यांवर होणार आहे.

रिलायन्स डिजिटलचा जिओ सिनेमा हा प्लॅटफॉर्म भारतातील क्रिकेट स्पर्धांचे स्ट्रिमिंग करणारा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म ठरणार आहे. यात आयपीएल, देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा आणि आयसीसीच्या प्रमुख स्पर्धांचा समावेश आहे. तर स्टार स्पोर्ट्स हे भारतातील क्रिकेट सामन्यांचे थेट प्रसारण करणारी प्रमुख वाहिनी होणार आहे.

दोन दिग्गजांच विलीनीकरण
रिलायन्स आणि डिस्नेच्या विलीनीकरणाला नुकतेच मूर्तरूप आल्यामुळे डिस्ने हॉटस्टारच्या भारतीय बाजारपेठेतून बाहेर पडण्याची प्रक्रिया वेग येऊ शकतो. त्यांच्याकडे सध्या आयसीसी ब्रॉडकास्टिंग हक्क आहेत. हे हक्क भारतात तरी जिओ सिनेमाकडे जातील. याचबरोबर स्पोर्ट्स १८ व रिलायन्सचे इतर स्पोर्ट वाहिनीसुद्धा भारतीय क्रिकेट ब्रॉडकास्टिंग जगतातील प्लेअर होऊ शकतात. भारताच्या द्विपक्षीय मालिका आणि महिला प्रीमियर लीग हे स्टार स्पोर्ट्सवरच पाहिले जाऊ शकते. बीसीसीआय व आयसीसी यांची भागीदारी अजून मजबूत होऊ शकते. जिओ व डिस्ने स्टार हे त्यांचे प्लॅटफॉर्म वाढवण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे क्रिकेट ब्रॉडकास्टिंगचे भविष्य उज्वल दिसते.