---Advertisement---

रिलेशन ठेव अन्यथा… नाजीमने हिंदू मुलीला धमकाविले

by team

---Advertisement---

जळगाव : मैत्रिणीसोबत महाविद्यालयात जात असताना तरुणाने गेटजवळ गाठत अल्पवयीन मुलीला रिलेशनशीप ठेवण्याचा आग्रह धरला. रिलेशन  न ठेवल्यास  चेहऱ्यावर ॲसिड फेकून चेहरा विद्रूप करेल, अशी धमकी अल्पवयीन हिंदू मुलीला तरुणाने दिल्याची घटना  शुक्रवार, 20 रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास पारोळा महाविद्यालयाच्या गेटजवळ घडली. या प्रकाराने मुलीचे कुटुंबिय भयभीत झाले आहे. याप्रकरणी भुऱ्या उर्फ नाजीमखान मुक्तारखान (रा. कुरेशी मोहल्ला, पारोळा ) याच्याविरुध्द पारोळा पोलीस ठाण्यात पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेला ‌‘लव्ह जिहाद’ची किनार असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी संशयिताला त्वरित अटक केली.

अल्पवयीन 17 वर्षीय मुलगी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. शुक्रवार, 20 रोजी सकाळी  या मुलीच्या वडिलांनी मुलीसह तिच्या मैत्रिणीला गावातील महाविद्यालयाजवळ सोडले. मुलगी गेटजवळ आली असता संशयित नाजीम याने तिला रोखत तू माझ्याशी रिलेशन ठेव, असा दम भरला. तू जर रिलेशन ठेवले नाही तर मी तुझ्या तोंडावर ॲसिड फेकून तुझा चेहरा खराब करेल

अशी धमकी दिली. या प्रकाराने पीडित मुलगी गर्भगळीत झाली. त्यानंतर बुधवार, 25 रोजी रात्री 11.30 वाजता संशयित हा पीडितेच्या घरासमोरुन जात असताना तिच्याकडे पाहूत अश्लील हातवारे केले. पीडितेने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर तिच्या पालकाने तिला सोबत घेत पोलीस ठाणे गाठत कैफियत मांडली. याप्रकरणी तक्रारीवरुन  बाललैगिंक अत्याचारापासून बालकांचे सरक्षण कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी संशयित नाजीमखान याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. तपास पोहेकॉ प्रवीण पारधी करत आहेत. या घटनेने पारोळा शहरात हिंदू बांधवांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी हिंदू संघटनांनी केली आहे.

 

 

 

 

 

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---