भुसावळ : रेल्वे गाड्यांना होत असलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशाासनाकडून दादर-गोरखपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-गोरखपूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-दानानूर दरम्यान १२ अनारक्षित उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या होणार आहे.
उन्हाळी हंगामात प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता दादर-गोरखपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-गोरखपूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-दानापूर दरम्यान अतिरिक्त अनारक्षित उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
दादर-गोरखपूर अनारक्षित विशेष गाडीच्या सहा फेऱ्या होतील. यात ०१०१५ अनारक्षित विशेष गाडी ४ मे या दिवशी दादर येथून रात्री ११.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता गोरखपूरला पोहोचणार आहे. या गाडीच्या तीन फेया होतील तर ०१०१६ अनारक्षित विशेष गाडी गोरखपूर येथून ६ मे या दिवशी दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री १२.२५ वाजता दादर येथे पोहोचेल. या गाडीच्या तीन फेऱ्या होतील. ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी आदी ठिकाणी थांबेल