भुसावळ : उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे गाड्यांना झालेली प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाकडून एलटीटी ते वाराणशी दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे गाडी चालविली जाणार आहे. यामुळे भुसावळ विभागातील प्रवाशांची सोय होणार आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य तिलक टर्मिनस ते वाराणसी दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यात लोकमान्य टिळक टर्मिनस ते वाराणसी उन्हाळी विशेष गाडीच्या आठ फेऱ्या होतील.
०४२२७ विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ६ ते २७ मे या काळात दर सोमवारी दुपारी एक वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११.२० वाजता वाराणसीला पोहोचेल. या गाडीच्या चार फेऱ्या होतील तसेच ०४२२८ विशेष गाडी वाराणसी येथून ४ ते २५ मे पर्यंत दर शनिवारी रात्री १०.२० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. या गाडीच्या चार फेऱ्या होतील.
ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, कानपूर, लखनऊ, अयोध्या कैंट, अयोध्या, शाहगंज आणि जौनपूर येथे थांबणार आहे. ८ मे पासून या गाडीचे आरक्षण सुरू करण्यात आले असून रेल्वे प्रवाशांनी सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे