रेल्वे प्रवाशांसाठी आनंदची बातमी! मुंबई, पुणे येथून बालेश्वर दरम्यान धावणार विशेष एक्स्प्रेस, ‘या’ ठिकाणी असेल थांबा

मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढणारी गर्दी कमी करण्यासाठी मुंबई व पुणे ते बालेश्वरदरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई-बालेश्वर सुपरफास्ट उन्हाळी विशेष गाडी ०१०५५ १८ मे रोजी ११ वाजून ५ मिनिटांनी मुंबई येथून सुटेल. दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी बालेश्वर येथे पोहोचेल

या ठिकाणी असेल थांबा
०१९५६ सुपरफास्ट विशेष गाडी रोजी ९ वाजून ३० मिनिटांनी बालेश्वर येथून सुटेल. दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजून ५० मिनिटांनी वाजता सीएसएमटी मुंबई येथे पोहोचेल. या गाड्यांना दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, भाटापारा, बिलासपूर, चंपा, सक्ती, रायगडा, झारसुगुडा, राउरकेला, क्रधरपूर, टाटानगर आणि खरगपूर असा थांबा आहे.

पुणे-बालेश्वर सुपरफास्ट उन्हाळी विशेष गाडी ०१४५१ (२ फेन्या)
१८ मे रोजी सकाळी ११.३० वाजता पुणे येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ९.३० वाजता बालेश्वर येथे पोहोचेल. ०१४५२ विशेष गाडी २० रोजी सकाळी ९ वाजता बालेश्वरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता पुणे येथे पोहोचेल. दरम्यान दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, भाटापारा, बिलासपूर, चंपा, सक्ती, रायगडा, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खरगपूर या ठिकाणी थांबेल.