---Advertisement---

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! भुसावळहुन धावणारी ही ट्रेन आज रद्द

by team
---Advertisement---

भुसावळ : तुम्हीदेखील रेल्वेने प्रवास करत असाल तर बातमी आहे तुमच्यासाठी भुसावळ विभागातील बिसवाब्रिज येथे डाऊन लूप लाइनची लांबी वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी नॉन इंटरलॉकिंगचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. त्यासाठी आज शुक्रवारी (दि.२२) सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत ब्लॉक घेतला आहे. यामुळे भुसावळ ते वर्धा मेमू गाडी शुक्रवारी रद्द केली आहे. तर वर्धा ते भुसावळ मेमू गाडी शनिवारी (दि.२३) धावणार नाही.

अजमेर ते पुरी एक्सप्रेस भुसावळ ते मलकापूर दरम्यान एक तास थांबवण्यात येईल, मडगाव ते नागपूर विशेष गाडी ही सुद्धा भुसावा ते मलकापूर दरम्यान एक तास थांबवली जाणार आहे. अंदुरा नांदेड एक्स्प्रेसला भुसावळ ते बोदवड दरम्यान ४५ मिनिटे शुक्रवारी थांबा देण्यात येईल, असे प्रशासनाने कळवले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment