सणासुदीमध्ये प्रवाशांची गर्दी होत अश्यातच रेल्वेने प्रवाश्यांसाठी खुशखबर दिली आहे.दसरा, दिवाळी लक्ष्यात घेता.प्रवाशाची गर्दी होत असल्याने मध्य रेल्वेने नागपूरवरून मुंबई तसेच पुणे मार्गावर विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
असं राहील रेल्वेच वेळापत्रक
०२१३९ मुंबई (सीएसएमटी)- नागपूर ही सुपरफास्ट द्वि साप्ताहिक विशेष गाडी १९ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या काळात धावेल. ही गाडी उपरोक्त कालावधीत दर सोमवार आणि गुरुवारी मुंबईवरून ००.२० वाजता सुटेल व त्याच दिवशी १५.३० वाजता नागपूरला पोहचेल. ०२१४० नागपूर- मुंबई ही गाडी २१ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर या काळात दर मंगळवार आणि शनिवारी १३.३० वाजता नगपूरवरून निघेल व दुसऱ्या दिवशी ४.१० वाजता मुंबई येथे पोहचेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एसी थ्रीचे १६ कोच राहतील.
०२१४४ नागपूर- पुणे सुपरफास्ट ही गाडी १९ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर या काळात दर गुरुवारी नागपूरवरून निघेल व दुसऱ्या दिवशी ११.२५ वाजता पुण्याला पोहचेल. ०२१४३ पुणे- नागपूर- ही गाडी २० ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत दर शुक्रवारी पुण्यावरून १६.१० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी ६.३० वाजता नागपूरला पोहचेल.