रेल्वे सुरक्षा बलाच्या मिशन जीवन रक्षकने वाचवले १३ प्रवाशांचे प्राण

भुसावळ : मध्य रेल्वेतील भुसावळ विभागात आरपीएफतर्फे मिशन जीवन रक्षकच्या माध्यमातून १३ प्रवाशांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. संपूर्ण मध्य रेल्वेतील पाचही विभागात ६६ जणांचे प्राण वाचवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रसंगी आरपीएफ जवानांनी जीव धोक्यात घातला होता.भुसावळ विभागात १३ प्रवाशांना जीवदान मध्य रेल्वेच्या नागपूर, भुसावळ, मुंबई, सोलापूर, पुणे या पाच विभागात रेल्वे सुरक्षा बलातर्फे मिशन जीवन रक्षकही संकल्पना राबविण्यात आली.

या योजनेत आरपीएफ जवानांनी जीव धोक्यात घालून भुसावळ विभागात १३ प्रवाशांचे प्राण वाचविले. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स कर्मचारी कामात नेहमीच आघाडीवर असतात आणि केवळ रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठीच नव्हे तर जीव वाचवणारे, पळून गेलेल्या मुलांचे रेस्क्यूअर्स आणि लगेज रिट्रीव्हर अशा अनेक भूमिका बजावत असतात. एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत, मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी मिशन जीवन रक्षक चा एक भाग म्हणून काही वेळा स्वतः चा जीव धोक्यात घालून ६६ जणांचे प्राण वाचवले. यामध्ये मुंबई विभागात १९, भुसावळ विभागात १३, नागपूर विभागात १४ आणि सोलापूर विभागात पाच पुणे विभागात १५ जणांचा समावेश आहे. आरपीएफच्या सतर्कतेने बहुतेक प्रकरणांमध्ये अशा प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत, जे काहीवेळा निष्काळजीपणा करतात आणि धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना धोक्याचा सामना करतात. रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्याच्या मुख्य उद्देश असलेल्या अमानत या ऑपरेशन अंतर्गत आरपीएफने त्यांच्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन गरजू प्रवाशांना मदत केली आहे. त्यांचे हरवलेले किंवा मागे राहिलेले सामान, मोबाईल फोन, लॅपटॉप, यासारख्या मौल्यवान वस्तू, प्रवाशांचे दागिने रोख आदी परत मिळवून दिले आहेत.