जळगाव : रोटरी क्लब ऑफ जळगाव इलाईट तर्फे मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे शनिवार दि. 21 जानेवारी रोजी रात्री ८ वाजता जिल्ह्यातील पाच मान्यवरांना रोटरी इंटरनॅशनल व्होकेशनल सर्विस अवॉर्डने गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष डॉ.पंकज शाह व मानद सचिव नीलेश झंवर यांनी दिली.
यांचा होणार गौरव
रोटरी तर्फे जगभरात जानेवारी महिना हा व्होकेशनल मंथ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त रोटरी जळगाव इलाईटतर्फे पंचवीस वर्षांपासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले भरत अमळकर, उद्योग क्षेत्रातील यशस्वी व्यक्तिमत्व रवींद्र लढ्ढा, कृषी क्षेत्रातील प्रगतिशील शेतकरी व कृषी भूषण नारायण चौधरी (भालोद ता. यावल) महिला सक्षमीकरण क्षेत्रातील नेतृत्व मीनाक्षी निकम (चाळीसगाव) आणि थॅलेसेमिया मुक्त समाज या ध्येयाने वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय योगदान देणाऱ्या डॉ. सई नेमाडे या पाच जणांना रोटरी इंटरनॅशनल व्होकेशनल सर्विस अवॉर्ड प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे नियोजन व्होकेशनल कमिटी डायरेक्टर श्रीराम परदेशी, प्रोग्राम कमिटी चेअरमन राजीव बियाणी, क्लब ऍडमिनिस्ट्रेशन कमिटी चेअरमन लक्ष्मीकांत मणियार यांच्यासह रोटरी जळगाव इलाईटचे सर्व सदस्य करीत आहे.