लँड फॉर जॉब प्रकरणात लालू कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ, आज तेजस्वी यादव यांची ED कडून चौकशी होणार

पाटणा: आज (३० जानेवारी) केंद्रीय तपास यंत्रणा ईडी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची नोकरी-जमीन घोटाळ्याप्रकरणी चौकशी करणार आहे. याच्या एक दिवस आधी, रविवारी राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांची ईडी ने 9 तासांहून अधिक काळ चौकशी केली.आरजेडी प्रमुखांच्या चौकशीदरम्यान आरजेडी खासदार आणि त्यांची मुलगी मीसा भारती उपस्थित होते. लालू यादव सोमवारी सकाळी ११.०५ वाजता ईडी कार्यालयात पोहोचले. यानंतर नऊ तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर ते रात्री ८.५० वाजता त्यांच्या निवासस्थानी रवाना झाले.

या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्याने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत लालू प्रसाद यादव यांचा जबाब नोंदवला आहे. सूत्रांनी सांगितले की, कथित घोटाळ्याच्या संदर्भात आरजेडी नेत्याची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून ईडी अधिकाऱ्यांचे एक पथक रविवारी (28 जानेवारी) पाटणा येथे पोहोचले होते.जनता दल युनायटेडचे ​​अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ‘महाआघाडी’पासून फारकत घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लालू प्रसाद केंद्रीय एजन्सीसमोर हजर झाले. आरजेडी या चौकशीला मोठे राजकीय षडयंत्र म्हणत आहे.