लँण्ड जिहाद-लव्ह जिहाद विरोधात मोठा निर्णय! “सरकारच्या संमतीविना हिंदू-मुस्लीमांच्या मालमत्ता परस्पर विक्री होणार नाहीत!”

दीसपूर : लँण्ड जिहाद आणि लव्ह जिहादविरोधात कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आसाम सरकार असल्याचे मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांनी सांगितले आहेत. या प्रकरणी आता आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा पारीत करणार असल्याची घोषणा केली. राज्यातील माता भगिनींच्या सुरक्षिततेसाठी आम्ही हा कायदा आणणार असल्याची माहिती आसाम सरकारने दिली आहे. तसेच लँण्ड जिहादविरोधातही अधिक कडक कारवाई करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

रविवार, दि. ४ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतला. भाजपच्या झालेल्या बैठकीत लव्ह जिहादवर मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. लव्ह जिहाद करणाऱ्यास जन्मठेप देण्यात येणार असल्याचा कायदा लवकरच अंमलात येईल, अशी घोषणा केली. तसेच राज्यातील मूळ रहिवाशांच्या जमीनींचे संरंक्षण व्हावे यासाठी कायदा अंमलात आणला जाईल असे हिमंत बिस्वा सरमा म्हणाले आहेत.

हिंमत बिस्वा यांनी जमीनीच्या कायद्यात तरतूद होतील असे सांगितले. हिंदू-मुस्लिम दोन धर्मातील लोकं आपली जमीन सरकारच्या अनुमतीशिवाय खरेदी -विक्री करू शकत नसल्याचे ते म्हणाले आहेत. तसेच त्यांनी राज्यातील युवकांच्या रोजगारावर देखील भाष्य केले आहे. राज्यातील १ लाख युवकांना नोकऱ्यांची संधी दिली जाईल असे, हिमंत बिस्वा सरमा म्हणाले.

नोकरीसाठी आसाममधील मूळ रहिवाशांना आसाम राज्य सरकार नोकरीची संधी उपलब्ध करून देणार आहेत. त्यांनी छत्तीसगडच्या मुस्लिम धर्माच्या लोकसंख्येवर भाष्य केले, ते म्हणाले की, १९९१ मध्ये छत्तीसगडमध्ये मुस्लिम समाज हा १२ टक्के होता. आता ४० टक्के झाला आहे. २०४१ सालापर्यंत छत्तीसगड हे राज्य मुस्लिमांचं राज्य होईल अशी चिंता त्यांनी व्यक्त केली होती. दरम्यान, उत्तरप्रदेशमध्ये काही महिन्यांआधी लव्ह जिहादच्या कायद्यात बदल केला, लव्ह जिहाद करणाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येणार असल्याचे बदललेल्या कायद्यात नमूद करण्यात येईल. तसेच दंडात देखील वाढ करण्यात आली आहे.