लग्नसराईचे बजेट कोलमडले, चांदीही 86 हजारांवर, तर सोने पोहचले 75 हजारावर

जळगाव:   ऐन लग्नाच्या मुहूर्तावर सोने चांदीचे भाव आवाक्याबाहेर झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांना भाव वाढीचा सामना करावा लागतो आहे, एक तोळे सोन्याचा शुक्रवारी (ता. १२) दर ‘जीएसटीसह’ ७५ हजार १९० होता, तर चांदीनेही ८६ हजार ५२० प्रतिकिलोचा टप्पा गाठत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे.

गुढीपाडव्याला सोन्याचा सकाळी दर जीएसटीसह ७३ हजार ५४२ वर (प्रतितोळा) होता. त्यात सायंकाळी एक हजाराची वाढ होऊन सोने ७४ हजार ३६६ रुपयांवर पोचले होते. चांदीच्या दरातही तीन हजारांची वाढ होऊन चांदी ८५ हजार ३८७ वर आली आहे. या भाववाढी मुळॆ सुवर्ण बाजारातील उलाढालीवर परिणाम झाला आहे