---Advertisement---

लग्नात झाला वाद, तरुणाला केली मारहाण; त्याने नैराश्येतून आयुष्यच संपवलं

---Advertisement---

जळगाव : तालुक्यातील भोलाणे येथे २० वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवार, १८ रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. भुषण लक्ष्मण कोळी (२०, रा. भोलाणे ता.जि.जळगाव) असे मृत तरूणाचे नाव आहे. दरम्यान, लग्नात झालेल्या वादातून मारहाण केल्याच्या नैराश्येतून तरूणाने आत्महत्या केल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे.

जळगाव तालुक्यातील भोलाणे येथे भूषण कोळी हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास  होता. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. शनिवार, १७ रोजी भोलाणे गावात लग्न होते. या लग्नाच्या कार्यक्रमात रात्री २ वाजता भूषण कोळी याचा गावातील काही तरूणांसोबत वाद झाला होता.

दरम्यान, गावातील स्वप्‍नील गोकुळ कोळी, गोविंदा जगन कोळी, कृष्णा उर्फ अरूण कोळी आणि किरण गणेश कोळी या चौघांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर त्याने मारहाण केल्याच्या नैराश्येतून राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली, असा आरोप मयत भूषणचे काका जनार्दन श्यामराव कोळी यांनी केला आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment