लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने ,त्याने उचले मोठे पाऊल

चाळीसगाव : शेतकरी तरुणाला मुलीकडून पसंती मिळत नसल्याने नैराश्यातून तरुणाने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथे घडली. याबाबत मेहुणबारे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रशांत भगवान पाटील (24, पिलखोड, ता.चाळीसगाव) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. मेहुणबारे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड गावात प्रशांत पाटील हा परिवारासह वास्तव्याला होता. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता.  लग्न होत नाही,  शेतकरी असल्याने आपल्याला मुलगी कुणी देत नाही, असा विचार करून हे आपले जीवन जगून काही उपायोग नाही, असे प्रशांतने  मेहुणे योगेश यांना बोलून दाखविले होते. या विवंचनेतून प्रशांत पाटील याने उपखेड शिवारातील गिरणा नदी पात्राजवळील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेवून तातडीने चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले.  हा प्रकार 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजेला उघडकीला आला. याप्रकरणी मेहुणबारे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक दीपक नरवाडे करीत आहे