मुंबई : दैनंदिन जीवन शैलीत लहान मुलनाचे झोपायच्या सवयीत बदल झाला आहे.मोबाईल च्या अतिवापर मुले देखाली हा परिणाम झाला आहे, त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे मुलांची झोप चांगली व्हावी या दृष्टीने शाळांच्या वेळा बदलण्याबाबत विचार व्हावा, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली.
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाचा प्रारंभ राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांवरील ताण दूर करण्याच्या दृष्टीने राज्यपाल बैस यांनी शिक्षण विभागाला अनेक सूचना केल्या. मुलांच्या दप्तराचा भार हलका करण्यासाठी पुस्तकविहीन शाळा, ई-वर्ग यांना चालना द्यावी. शाळांचे गुणवत्तेनुसार श्रेणीकरण करून त्यांना बक्षिसे द्यावीत. यातून शाळांमध्ये सुधारणेसाठी स्पर्धा होईल, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आनंददायी ठरावे यासाठी शिक्षकांनी त्यांना गृहपाठ कमी द्यावा; तसेच खेळ आणि इतर कृतिशील उपक्रमांवर भर द्यावा, सायबर गुन्ह्यांपासून मुलांचे रक्षण व्हावे यासाठी शाळांमध्ये व्या‘याने, सत्रांचे आयोजन करावे. राज्यात शेकडो सार्वजनिक ग्रंथालये आहेत. मात्र, ही ग्रंथालये आज ओस पडली आहेत. बहुतांश पुस्तके जुनी किंवा कालबाह्य झाली आहेत. सर्व वाचनालयांना इंटरनेट, कॉम्प्युटर सुविधा देऊन नवसंजीवनी देणे आवश्यक आहे. यासाठी ग्रंथालय दत्तक योजना सुरू केली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.