लाखों दिव्यांनी उजळणार अयोध्या नगरी! इतके लाख दिवे लावले जाणार

अयोध्या : दिवाळी सुरु होण्यासाठी आता काहीच दिवस बाकी आहेत. सगळीकडे नागरिक दिवाळीची तयारी ही जोरात चालू आहे.अश्यातच अयोध्येतील दिवाळीची चर्चा सगळी कडे सुरु आहे,दिवाळी साठी मातीचे दिवे तयार करण्याचे काम जोरात सुरु आहे. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. दरवर्षी अयोध्येतील दिवाळी लाखों दिव्यांची आरास करुन साजरी केली जाते. यावर्षीही अयोध्या नगरी २१ लाख दिव्यांनी उजळणार आहे.

यावर्षी अयोध्येतील ५१ घाटांवर २१ लाख दिवे लावणार असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे. प्रभू श्रीराम १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले होते. या घटनेचा आनंद दिवाळीमध्ये साजरा करण्यात येतो.दरम्यान, अयोध्या शहरातील सर्व धार्मिक स्थळे, मठ आणि मंदिरांच्या सजावटीला सुरुवात झाली आहे. यावेळी सरयू नदीच्या आजूबाजूला लाखों दिव्यांची आरास केली जाते. देशभरातून असंख्य भाविक अयोध्येतील दिवाळी अनुभवण्यासाठी येत असतात. त्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात येत आहे.