चोपडा : वाळू वाहतुकीस परवानगीच्या मोबदल्यात, विटनेर (ता.चोपडा) येथील तलाठी रवींद्र पाटील यांना पाच हजाराची लाच स्विकारताना जळगाव लाच लुचपत प्रतिबंध पथकाने मंगळवार, २८ रोजी रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला. या कारवाईमुळे वाळू तस्करीत हात ओले करणा-या महसूल विभागातील कर्मचा-यात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार यांचे सासऱ्याचे नावाने पंतप्रधान आवास योजनांतर्गत घरकूल मंजुर झालेले होते. घरकूल बांधण्यासाठी रेतीची आवश्यकता असल्याने यातील आलोसे यांनी तक्रारदार यांचे कडेस वाळू ट्रक्टरचे वाहतूकीसाठी 10 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी 27 मे 2024 रोजी लाच लुचपत प्रतिबंध विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती. त्यानुसार पंचा समक्ष 28 मे 2024 रोजी पडताळणी केली असता आलोसे यांनी पंचा समक्ष 5000 हजार रुपयाची लाचेची मागणी केली. त्यानंतर आलोसे यांना 5000 हजार रुपयाची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांचेवर चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
सापळा पर्यवेक्षक अधिकारी सुहास देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. अमोल वालझाडे यांच्यासह पथकातपो.ना. बाळू मराठे, पोकॉ प्रणेश ठाकूर,पोनि एन.एन. जाधव ,सफौ दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ सुरेश पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे,मपोहेकॉ शैला धनगर ,पोना.किशोर महाजन, पोना. सुनिल वानखेडे ,पोकॉ. प्रदीप पोळ, पो.कॉ.राकेश दुसाने, पोकॉ अमोल सुर्यवंशी, पोकॉ सचिन चाटे यांनी ही कारवाई केली.