लाडकी बहिण योजनेला मुदतवाढ! बहिणींना ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसंदर्भात एक महत्वाची बातमी पुढे आली आहे. या योजनेला आता मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत त्या महिला येत्या ३१ सप्टेंबरपर्यंत लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करू शकतात.

संपूर्ण राज्यभरात लाडकी बहिण योजनेला उदंड प्रतिसाद मिळत असून अनेक पात्र महिलांना त्याचा लाभही मिळला आहे. दरम्यान, आता या योजनेला ३१ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे आता महिला ३१ तारखेपर्यंत अर्ज भरून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा १५०० रूपये मिळणार आहेत. ३१ ऑगस्ट रोजी लाखों महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून ३ हजार रुपये जमा करण्यात आले. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात अर्ज भरणाऱ्या महिलांच्या खात्यात तीन महिन्यांचे मिळून ४ हजार ५०० रुपये जमा होणार आहेत.