आयझॉल, आता नुकतेच निवडणूक मिझोरम मध्ये संपली आहे. व आता मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी पीपल्स मूव्हमेंट नेते लालदुहोमा यांची तयारी चालू आहे, आज शुक्रवारी पीपल्स मूव्हमेंट नेते लालदुहोमा मिझोरामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, लालदुहोमा व्यतिरिक्त झेडपीएमचे इतर काही नेतेही आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांनी सांगितले की, राज्यपाल हरी बाबू कंभमपती लालदुहोमा आणि इतर मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.
आयझॉलमध्ये हवामान चांगले राहिल्यास राजभवन परिसरात शपथविधी सोहळा होणार आहे. हवामान चांगले नसल्यास विधानसभेच्या इमारतीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.आयझॉलमध्ये गुरुवारी जोरदार पाऊस झाला. मिझोराममध्ये 40 सदस्यांची विधानसभा आहे आणि राज्यात मुख्यमंत्र्यांसह 12 मंत्री असू शकतात.