लेखनी बंद आंदोलन स्थगीत, पण अटक होईपर्यंत काळ्या फिती लावून काम

जळगाव : महापालिकेचे अभियंता प्रसाद पुराणिक यांना भाजपचे पदाधिकारी भूपेश कुलकर्णी यांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्त महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरू केले लेखणीबंद आंदोलन पोलीस विभागाच्या विनंतीनुसार तृर्तास स्थगित करीत आहोत. मात्र संशयीतास जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत सर्व कर्मचारी काळ्या फिती लावून बुधवार, ७ पासून दैनंदिन कामकाज करणार आहे.

पोलीसांनी संशयितास अटक न केल्यास मात्र सर्व कर्मचारी मिळून आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे यांनी मंगळवारी, ५ रोजी त्यांच्या दालनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.अभियंता प्रसाद पुराणीक यांना भाजपाचे पदाधिकारी भूपेश कुलकर्णी यांनी शिविगाळ करीत मारहाण केली होती. त्याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान संशयीताने न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्जही केला होता. तो फेटाळण्यात आला.आजपासून कामकाज सुरू दरम्यान, पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार लेखणी बंद आंदोलन स्थगीत करत असल्याची घोषणा त्यांनी या पत्रकार परिषदेत केली.काळ्या फिती लावून कामकाज जोपर्यंत संशयितास अटक होत नाही तोपर्यंत अधिकारी व कर्मचारी काळ्या फिती लावून कामकाज करणार आहेत. संशयितांचा कर्ता करविता कोण मारहाण झाल्याच्या दुपारी दिवशी माजी नगरसेविका सुरेखा तायडे यांची पती नितीन तायडे यांनी शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर फोन करून मी संशयीत भूपेंद्र कुलकर्णी यांना तुमच्याकडे घेवून येतो. अभियंता प्रसाद पुराणिक यांची माफीही मागायला लावतो.

हे प्रकरण मिटवून टाकू असा प्रस्ताव ठेवला. मात्र अभियंता सोनगिरे यांनी कर्मचाऱ्याची बाजू घेण्याऐवजी संशयीताची बाजू घेता आहात. हे बरोबर नसल्याचे सांगितले. मंगळवारी, ६ रोजी नितीन तायडे यांचा पुन्हा फोन आला व तुम्ही लेखणी बंद आंदोलन करत आहात याचा तुम्हाला पगार मिळेल का, असा प्रश्न विचारला. त्यावर याबाबतचा निर्णय हे आयुक्त घेणार असल्याचेही अभियंता सोनगिरे यांनी त्यांना सांगीतले.

कारवाई करणार : जिल्हाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे
याबाबत भाजपच्या जिल्हाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे यांच्याशी संपर्क साधला असता महापालिकेच्या अभियंत्यांना झालेला मारहाणीचा प्रकार चुकीचा आहे. भाजपची शिस्त मोडून जर कोणी काही करत असेल, तर त्याची दखल घेत योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

आरोप चुकीचे : नितीन तायडे
याबाबत माजी नगरसेविका सुरेखा तायडे यांचे पती नितीन तायडे यांच्याशी संपर्क साधला असता अभियंता सोनगिरे यांनी
केलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. संशयीतास घेऊन येणार असे काहीच बोललो नाही. प्रभागातील कामांबाबत त्याच्याशी बोललो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच झालेला प्रकार हा चुकीचा असून या घटनेचा निषेध करत मीही अभियंता पुराणिक यांच्यासोबत असल्याचा पुनरूच्चार केला.