जळगावः लोकसभा आचारसंहितेचा फटका शिधपत्रधारकांना बसणार आहे. शिधापत्रधारकांना शासनाकडून सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध योजनांअंतर्गत वस्तूंचे वाटप करण्यात येत असते. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने ही वाटप थांबविण्यात आली आहे. जिल्ह्यात १ हजार ९८३ रास्त रेशन दुकानदार आहेत. शिधापत्रधारकांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत असते.
यासोबत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न घेतला जाईल. प्राथमिक शिधापत्रधारकांना १० किलो क्षमतेची पिशवी (डी कॅरी बॅग) वाटप करण्यात येते. यासोबत अत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दरवर्षी प्रतिकुटुंब एक साडी मोफत वितरीत करण्यात येते. परंतु, आचारसंहिता लागू झाल्याने ही सर्व वाटप थांबविण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्याने वैयक्तिक लाभाच्या योजना थांबविण्यात आल्या असून नविन लाभार्थ्यांची निवड केली जाणार नाही. तसेच होळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त देण्यात येणारा आनंदाचा शिधा आचारसंहितेमुळे मिळू शकणार नाही
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. चालू महिन्याचे धान्य रेशन दुकानदारांना पोहचले असले तरी त्याचे वितरण होणार नाही. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन केले जाईल. शासन निर्णयानुसार साडी वाटप, आनंदाचा शिधा वाटप थांबविण्यात आला आहे. संबंधितांना तशा सूचना केल्या आहेत. शिधा वाटपासंदर्भातील निर्णय वरिष्ठ पातळीवरुन आलेल्या निर्णयानुसार
– संजय गायकवाड जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव