Lok Sabha elections 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय समितीकडून आज दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आली आहे. केरळमधील ज्ञानेश कुमार आहेत तर सुखबीर संधू हे पंजाबमधील आहे. सुखविंदर संधू हे उत्तराखंडचे मुख्य सचिव आणि NHAI चे चेअरमन राहिले आहेत. ज्ञानेशकुमार १९८८ बॅचचे केरळचे आयएएस अधिकारी आहेत.